Loksabha election 2019 निवडणुकीच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

लढाई लोकसभेची - दिवसभरातल्या राजकीय घडामोडींचा वेध, राज्यातल्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व राजकीय बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 07:39 PM IST

Loksabha election 2019 निवडणुकीच्या सर्व बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

 लोकसभा 2019: नितीन गडकरींच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ!

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षात गडकरी यांच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गडकरींनी सादर केलेल्या माहितीनुसार 2017-18 मध्ये त्यांची उत्पन्न 6.4 लाख इतके होते. तर 5 वर्षापूर्वी 2013-14मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.7 लाख इतके होते. 2014-15 या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात 6 लाखांनी वाढ झाली. त्यानंतर त्यांचे उत्पन्न मात्र स्थिर आहे.

SPECIAL REPORT: पक्षांतर्गत बेदिलीनं काँग्रेसचा पाय खोलात

मुंबई : अनेक दशकं राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला सध्या गटबाजीनं ग्रासलंय. रोज एक नेता पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जातोय किंवा बंडखोरी तरी करतोय. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या या भूमिकेनं कार्यकर्ते मात्र निराश आहेत.

किरीट सोमय्यांचा पत्ता कट, या नेत्याला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता?

मुंबई : मुंबईतून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची घोषणा झालीय. तर भाजपचा फक्त एका जागेचा पेच कायम आहे. ती जागा आहे ईशान्य मुंबईची. इथले खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. त्यामुळे या जागेवर भाजप श्रेष्ठी मनोज कोटक यांच्या नावाचा विचार करताहेत.

लोकसभा 2019: औरंगाबादमध्ये तिहेरी लढत, MIMकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा औरंगाबादमधून यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील अशी लढत होणार आहे.

पालघर: श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट, राजेंद्र गावित यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई : सोमवारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पालघरमधून राजेंद्र गावित हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहे. तर श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राजेंद्र गावित हे आता पालघरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

SPECIAL REPORT: बोलण्याच्या नादात पातळी सोडताहेत 'वाचाळवीर'

निवडणुकीचं रण आता चांगलंच तापायला लागलं आहे. अशात नेत्यांच्या भाषणबाजीला ऊत आला असून, बोलण्याच्या नादात अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचं दिसून येत आहे. पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना बीडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ते चक्क दहशतवादी असं म्हणाले. असे अनेक वाचाळवीर आहेत ज्यांनी टीका करताना आपली पातळीच सोडली.

गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही, मोदी देशाचं रक्षण काय करणार - पवार

परभणी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांना देशाची गुप्त माहिती नीट ठेवता येत नाही, ते देशाचं काय रक्षण करणार असा सवाल त्यांनी केलाय. राफेलची कागदपत्रं चोरीला गेली होती असं सरकारने सुप्रीम कोर्टात सांगतलं होतं त्यावरून पवारांनी ही टीका केलीय.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून बड्या नेत्याच्या नावाची चर्चा, दिल्लीत हालचालींना वेग

नवी दिल्ली : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर विचार केला जात आहे. तसंच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचंही नाव आघाडीवर आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आता दिल्लीमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित आहेत.

SPECIAL REPORT: आजीची घोषणा तारणार का नातवाला?

काँग्रेसने पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा देत गरिबांची मतं मिळवण्यासाठी चंग बांधला आहे. गरिबांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा करत राहुल गांधींनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रकाश आंबेडकर का लढत आहेत या दोन जागेंवरून?

मुंबई  : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि विदर्भातल्या अकोल्यातून निवडणूक लढविणार आहेत. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशनंतर प्रियंका गांधींचं टार्गेट महाराष्ट्र, असा असेल नवा प्लॅन!

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी त्या प्रचार करण्याची शक्यता आहे. सध्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केलं असून तिथं त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यांनी राज्यातही सभा घ्यावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती. त्यामुळे त्या आता महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इंदूरच्या ताईंच्या घरी एवढा सन्नाटा का ?

इंदूर : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यानंतर लोकसभेच्या मावळत्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांचं वय ७६ वर्षं आहे. या निवडणुकीत वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी न देण्याचं भाजपचं धोरण आहे. म्हणूनच सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीवर अजूनही विचार सुरू आहे.

भाजपची आणखी एक यादी जाहीर, 39 उमेदवारांच्या नावाची घोषणा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 29 तर पश्चिम बंगालमधील 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मेनका गांधी आणि वरूण गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे.

VIDEO: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळताच मिलिंद देवरा म्हणाले...

मुंबई, 26 मार्च : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली आहे. मिलिंद देवरा हे स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीनंतर मुंबईतील सहापैकी पाच मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. ''मी जनतेसमोर सकारात्मक अजेंडा ठेवला आहे.

VIDEO: ...आणि सुषमा स्वराज नितीन गडकरींना म्हणाल्या 'विजयी भव'

नवी दिल्ली: दिल्लीतील भाजपच्या कार्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची सोमवारी बैठक झाली. यात बैठकीसाठी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी देखील उपस्थित होते. बैठकीसाठी सुषमा यांच्या बरोबरच गडकरी देखील कार्यालयात पोहोचले. तेव्हा गडकरी यांनी स्वराज यांना नमस्कार केला. तेव्हा स्वराज यांनी गडकरींच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटयुझर्स दोन्ही नेत्यांचे कौतुक करत आहेत.

VIDEO : 'चौकीदार चोर नही, चौकीदार प्युअर है'

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या एका प्रचार सभेत चौकीदार चोर है असं म्हणणाऱ्यांना चारोळ्यांच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलं. ''चौकीदार चोर नही, चौकीदार प्युअर है, चौकिदारका दुबारा पीएम बनना श्युअर है'' अशा शब्दात त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींची स्तुती केली.

VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहा ठिकाणी सुनेत्रा पवार यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ''वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत'' असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

...जेव्हा नवनीत राणा बैलगाडीतून जाऊन भरतात उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाआघाडी समर्थीत युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नवनीत राणा यांनी चक्क बैलगाडीतून जाऊन अर्ज दाखल करत जोरदार शक्ती परदर्शन केलं. जिल्ह्यातून आलेले त्यांचे हजारो समर्थक या रॅलीमध्ये सामील झाले होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांनी राजापेठ चौकात जाहीर सभा घेतली. या सभेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close