S M L

अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर

अलिबाग जवळच्या अक्षी गावत एकाच कुटूंबातील 5 जणांनी विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Jul 4, 2018 04:27 PM IST

अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर

अलिबाग,ता,4 जुलै: अलिबाग तालुक्‍यातील आक्षी गावातील एकाच कुटुंबातील 5 जणांनी विषारी औषध पिवून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला.  कौटुबिक वादातून ही घटना घडली आहे . रामचंद्र पाटील त्‍यांची पत्‍नी रंजना पाटील सून कविता पाटील आणि स्‍वराज पाटील व स्‍वराली पाटील  अशी त्‍यांची नावे आहेत . या पाचही जणांना अलिबागच्‍या जिल्‍हा रूग्‍णालयात अतिदक्षता विभागात  उपचार सुरू आहेत. यापैकी स्‍वराज याची प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांला मुंबई येथे हलवण्‍यात येत आहे. दुपारी 12 वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली .

या सर्वांनी शीतपेयातून विष घेतले आहे. त्‍यामुळे त्‍यांना उलटया सुरू झाल्‍या . दोन लहान मुले रडू लागली तेव्‍हा शेजारच्‍यांच्‍या हा प्रकार लक्षात आला . त्‍यांनी या सर्वांना रूग्‍णालयात दाखल केले . रामचंद्र पाटील हे रिक्षा चालवण्‍याचा व्‍यवसाय करतात तर त्‍यांचा मुलगा  मुलगा राहुल हा रबाळे येथे नोकरीनिमित्‍त रहात असतो अशी माहिती मिळाली आहे .

हेही वाचा...


नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

Loading...

विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 04:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close