किशोर खत्री हत्याकांड : रणजितसिंह चुंगडेसह निलंबित पोलीसाला जन्मठेप

किशोर खत्री हत्याकांड : रणजितसिंह चुंगडेसह निलंबित पोलीसाला जन्मठेप

अकोल्यातील बहुचर्चित बिल्डर किशोर खत्री हत्येप्रकरणी दोघांना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

  • Share this:

अकोला, 27 सप्टेंबर : अकोल्यातील बहुचर्चित बिल्डर किशोर खत्री हत्येप्रकरणी दोघांना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. एका राजकीय पक्षाचा माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे आणि निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी उर्फ जसवन्तसिंह या दोघांना जन्मठेप सुनावण्यात आली. 3 डिसेंबर 2015ला बिल्डर किशोर खत्री यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय.

आरोपी एका राजकीय पक्षाचा माजी जिल्हाप्रमुख रणजितसिंह चुंगडे आणि निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी उर्फ जसवन्तसिंह या दोघांना अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. 3 डिसेंबर 2015 रोजी बिल्डर किशोर खत्री याची आर्थिक देवाण घेवाणातून बंदुकीच्या गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचा आरोप रणजित चुंगडे आणि त्याच्या 3 साथीदारांविरुद्ध होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात झाली.

कट रचून हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपी रणजितसिंह चुंगडे आणि साथीदार जस्सी उर्फ जसवंतसिंह याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

 VIDEO : पाच मुलींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी झोड-झोड-झोडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 10:07 PM IST

ताज्या बातम्या