S M L

खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण थोडक्यात बचावला

Updated On: Sep 11, 2018 06:55 PM IST

खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण थोडक्यात बचावला

अकोला, 11 सप्टेंबर : अन्न,पाणी, निवारा आणि मोबाईल हे आता जणू समिकरणच तयार झालंय. पण हाच मोबाईल फोन तुमच्या जीवावरही बेतू शकतो.. तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन ठेवला खिश्यात होता, फोन आला म्हणून बाहेर काढला असता त्याचा स्फोट झाला. सुदैवाने तरुणाने मोबाईल खाली फेकल्यामुळे मोबाईल स्फोटातून थोडक्यात बचावला.

परमेश्वर पवार नावाच्या तरुणाकडे एमआय कंपनीचा रेडमी हा मोबाईल होता. परमेश्वर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामासाठी घरुन निघाला होता. आॅफिसवरून फोन आल्यानंतर हातात फोन घेतल्यानंतर तो नेहमीपेक्षा गरज वाटला. त्याने मोबाईल नीट तपासून पाहिला असता तो फुगत असल्याचं जाणवलं. काही वेळातच अचानक त्यातून धुर येऊ लागला. त्याने मोबाईल फेकताच त्याचा स्फोट झाला.

सुदैवानं परमेश्वरने वेळीच मोबाईल दूर फेकल्यानं जीवितहानी टळली.

हा मोबाईल माझ्या शर्टाच्या वरच्या खिश्यात होता. जर मोबाईलचा खिश्यात स्फोट झाला असता तर माझ्या जीवाचं बरंवाईट झालं असतं असं परमेश्वरने सांगितलं.

Loading...
Loading...

गेल्या काही दिवसांपासून मोबाईल स्फोटांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतीये. त्यामुळे मोबाईल वापरताना विशेष काळजी घ्या.

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 06:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close