VIDEO : अकोला महापालिकेत स्मशानभूमीवरून राडा!

VIDEO : अकोला महापालिकेत स्मशानभूमीवरून राडा!

गुरूवारी अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरु होताच शिवसेना आणि एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी राडा घातला आणि प्रकरण हातघाईवर आले.

  • Share this:

अकोला, ता. 12 जुलै : गुरूवारी अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरु होताच शिवसेना आणि एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी राडा घातला. सभा चालू होताच नगरसेवकांनी बंद करण्यात आलेली महापालिकेची कॉन्व्हेंट आणि गुलजारपुरा स्मशानभूमीतील असुविधा या विषयांवर दोघांनी वाद घालुन सभागृह डोक्यावर घेतले. गुरुवारी सकाळी 11 वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु होताच एमआयएमचे नगरसेवक मुस्तफा यांनी सभेला उपस्थित महापौर विजय अग्रवाल, आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासमक्ष गुलजारपुऱ्यातील स्मशानभूमीत असलेल्या असुविधा मांडल्या. यावरून नगरसेवकांमध्ये वाद झाला आणि मुद्यावरून ते गुद्यावर आले. वातावरण एवढं तापलं की त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या सामानाची मोडतोड केली.

सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असतांनाच सेनेचे नगरसेवक शशी चोपडे यांनी नुकत्याच सुरु होऊन बंद पडलेल्या महापालिकच्या कॉन्व्हेंटचा विषय उचलून धरला. स्मशानभूमीचा विषय अर्ध्यावरच राहिल्याने एमआयएमचे मुस्तफा यांनी शशी चोपडे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये वाद वाढत गेला. दरम्यान चोपडे यांनी मुस्तफा यांच्या धार्मिक भावनांवर घाव घातले आणि सभागृहात एकच हल्लकल्लोळ माजला. शेवटी काही नगसेवकांनी मध्यस्ती केली आणि नगरसेवक साजिद खान पठाण यांनी माफी मागितली आणि प्रकरण शांत झालं.

हेही वाचा...

... म्हणून संघाच्या मुखपत्राने राजकुमार हिरानींना फटकारले

नाशिकमध्ये गॅस्ट्रोच्या थैमानाने 4 जणांचा बळी, 150 जण रुग्णालया

वांद्र्याच्या सरकारी वसाहतीचा स्लॅब कोसळला, आई आणि मुलगा गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 03:47 PM IST

ताज्या बातम्या