अकोला लोकसभा निवडणूक : प्रकाश आंबेडकरांसाठी प्रतिष्ठेची लढत

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यापुढे चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 03:10 PM IST

अकोला लोकसभा निवडणूक : प्रकाश आंबेडकरांसाठी प्रतिष्ठेची लढत

अकोला, 16 मे : अकोला लोकसभा मतदारसंघावर एक अपवाद वगळता गेल्या 30 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे.यावेळीही भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही इथून निवडणूक लढवली.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना 4 लाख 56 हजार 472 मतं मिळाली तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना 2 लाख 53 हजार 356 मतं मिळाली. भारिपचे प्रकाश आंबेडकर यावेळी तिसऱ्या स्थानावर होते.

आता भाजपसमोर आव्हान

यावेळी मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने इथे चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे. 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर आणि मखराम पवार यांनी भारिपचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मिळवलेला विजय चांगलाच गाजला होता. त्याचा अकोला पॅटर्न म्हणूनही उल्लेख केला गेला. मात्र नंतर तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही.

Loading...

संजय धोत्रेंची हॅटट्रिक

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला जिल्ह्यातल्या 5 आणि वाशिम जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अकोल्यामध्ये भाजपच्या संजय धोत्रे यांनी 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्याआधी भारिप बहुजन महासंघातर्फे प्रकाश आंबेडकर 1999 मध्ये निवडून आले होते.

अकोल्यामध्ये अकोट, बालापूर, अकोला पश्चिमस, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

थेट लढत

या मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे संजय धोत्रे यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. आता मतदारांनी यापैकी कुणाला कौल दिला आहे हे 23 मे ला कळू शकेल.

प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासोबतच सोलापूरमधूनही निवडणूक लढवत आहेत. तिथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी आणि प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...