अकोल्यातील बिल्डर अमित वाघ पत्नी आणि दोन मुलांसह साताऱ्यातून बेपत्ता

अकोल्यातील बिल्डर अमित वाघ पत्नी आणि दोन मुलांसह साताऱ्यातून बेपत्ता

अमित यांच्यासह त्यांची पत्नी प्रियंका, दोन मुले १३ जूनपासून बेपत्ता झाले आहे. सातारा पोलिसांसह अकोला पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

  • Share this:

29 जून : अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाले आहेत. अमित यांच्यासह त्यांची पत्नी प्रियंका, दोन मुले १३ जूनपासून बेपत्ता झाले आहे. सातारा पोलिसांसह अकोला पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला का?, याचा तपास पोलीस करत आहेत.

अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झालेत. अमित यांच्यासह त्यांची पत्नी प्रियंका आणि दोन मुले स्पंदन व शाश्वत १३ जूनपासून बेपत्ता झाले आहेय. अमित हे अकोल्यातील खडकी येथील संतोषनगरात भागात राहतात. ते अकोला येथून ३ जूनपासून पत्नी आणि दोन मुलांसह सहलीला गेलेय. १३ जूनला ते साताऱ्याला होते.

मात्र त्यानंतर तब्बल १५ दिवसांपासून त्यांचा कुणाशीच संपर्क नाहीये. यासंदर्भात अकोल्यातील त्यांचे सासरे सुरेश वाणे यांनी २२ जूनला अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये. अकोला पोलिसांनी हे प्रकरण सातारा पोलिसांच्या मदतीने सोडायला सुरूवात केलीये.

बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला का?, याचा तपास पोलीस करतायेत. वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहेय. तर काही बांधकाम पूर्णत्वास गेलेली आहेत. अमित वाघ यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय होताय. भागीदारीतील हा व्यवसाय अडचणीतही आल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 08:34 PM IST

ताज्या बातम्या