बेपत्ता असलेल्या 'आप'नेत्याची मित्रासह हत्या,जंगलात सापडले मृतदेह

बेपत्ता असलेल्या 'आप'नेत्याची मित्रासह हत्या,जंगलात सापडले मृतदेह

आपचे नेता मुकींम अहमद आणि शफी कादरी हे दोघे गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता होते.

  • Share this:

अकोला, 04 आॅगस्ट : अकोला येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद आणि बुलडाणा जिल्हातील साखरखेर्डा येथील शफी कादरी यांचे काही दिवसाआधी अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. मात्र आज बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ शिवारातील जंगलात त्यांचे मृतदेह सापडले आहेत .या दोघांची व्यावसायिक स्पर्धेतून अकोला शहरात ३० जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पाथर्डी घाट परिसरात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आपचे नेता मुकींम अहमद आणि शफी कादरी हे दोघे गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता होते. त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार  अकोला इथं पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. दोन आॅगस्ट रोजी शहनाज यांच्या तक्रारीवरून अकोला खदान पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभिर्य पाहता अकोल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सहा अधिकाऱ्यांचे एक पथक तपासासाठी गठीत केले होते. प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारावर अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी माने, पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण आणि त्यांची चमू दोन दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्याच्या पट्ट्यात या प्रकरणाचा तपास करीत होती.

दरम्यान, अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या सांगण्यानुसार अकोला पोलीस तपास करीत देऊळगाव साकर्शा नजीकच्या पाथर्डी घाटात मुकीम अहेमद आणि शफी कादरी यांचे मृतदेह शोधण्यासाठी पोहोचली. आज 4 ऑगस्ट रोजी दुपारी या दोघांचे मृतदेह या जंगल भागात सापडले. दोघांचेही मृतदेह हे डीकंपोज झाले असल्याने घटनास्थळीच त्यांच्या पार्थिवाचे डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले.

मुकीम अहेमद आणि शफी कादरी यांना अकोला इथं जेवणास बोलावून तेथे ३० जुलै रोजी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या प्रकरणात जवळपास १५ आरोपी असण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील सहा ते सात आणि अकोला जिल्ह्यातील चार आरोपींचा यात समावेश असल्याचं पोलीस सुत्राचं म्हणणं आहे. प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी मुकीम अहेमद यांच्या पत्नी शहनाज यांच्या तक्रारीवरून तसव्वुर खान कादरी, कौसर शेख, शेख चांद, अजीम, शेख कलंदर, शेख मुजफ्पर आणि शेख अकिल यांच्यासह अन्य काही जणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात अकोला पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सात जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा

 ...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे

आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 07:38 PM IST

ताज्या बातम्या