महाराष्ट्रात 'दादा'च, सुप्रियाताईंचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीतल्या वादावर पडदा!

महाराष्ट्र यापुढे अजितदादांच्या नेतृत्वातच पुढे जाईल असं राष्ट्रवादीच्या खासदार आणि पक्षाच्या मातब्बर नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केलं. पुण्यातल्या वारजे इथं हल्लाबोल यात्रेच्या सभेदरम्यान त्या बोलत होत्या. सुप्रियाताईंच्या या स्पष्टीकरणामुळं महाराष्ट्रात अजित पवारच क्रमांक एकचं नेतृत्व राहिल हे आता स्पष्ट झालंय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2018 05:52 PM IST

महाराष्ट्रात 'दादा'च, सुप्रियाताईंचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीतल्या वादावर पडदा!

पुणे,ता.11 एप्रिल: महाराष्ट्र यापुढे अजितदादांच्या नेतृत्वातच पुढे जाईल असं राष्ट्रवादीच्या खासदार आणि पक्षाच्या मातब्बर नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केलं. पुण्यातल्या वारजे इथं हल्लाबोल यात्रेच्या सभेदरम्यान त्या बोलत होत्या. सुप्रियाताईंच्या या स्पष्टीकरणामुळं महाराष्ट्रात अजित पवारच क्रमांक एकचं नेतृत्व राहिल हे आता स्पष्ट झालंय. सुप्रिया सुळे या दिल्लीत खासदार असल्या तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादीत क्रमांक एक कोण? हा कायम चर्चेचा विषय होता. दादा की ताई अशी चर्चा कायम दबक्या आवाजात होत असे. आता खुद्द सुप्रियाताईंनीच खुलासा केल्यानं राष्ट्रवादीतल्या नेतृत्वाच्या वादावर पडदा पडल्याचं बोललं जातेय.

सुप्रियाताईंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी सभेत एकच जल्लोष करत त्यांना दाद दिली. यावरून दादांची कार्यकर्त्यांमध्ये असलेली लोकप्रियता स्पष्ट होते. यावेळी व्यासपीठावर अजित पवारांसहीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. बेधडक फटकळ स्वभाव आणि कामाची धडाडी असल्यानं कार्यकर्त्यांच्या मनात दादांबद्दल कायम आदर आणि धाकही असतो. अजित पवारांचं राज्यभर कार्यकर्त्यांचं स्वतंत्र जाळही असल्यानं उघडपणे दादांना आव्हान देण्याची क्षमता कुणाही नेत्यानं कधी दाखवली नाही.

आघाडीची महाराष्ट्रात सत्ता असताना उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं त्यावळी कायम शरद पवारांनी आर.आर.पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि छगन भुजबळांना संधी दिली. आघाडी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये तर उपमुख्यमंत्रीपदावर छगन भुजबळांची वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट होताच, दादा रूसून अज्ञातवासात गेले होते. शेवटी शरद पवारांना त्यांची मनधरणी करावी लगाली होती. नंतर भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना तुरूंगात जावं लागलं त्यामुळं अजित पवारांचा सर्वात मोठा अडसर दूर झाला होता. आता सुप्रिया ताईंनीच खुलासा केल्यानं अजित पवारांची राज्यातल्या राजकारणावरची पकड आणखी घट्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...