बारामतीचं पाणी वळवण्याची भाजपची खेळी, अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीप्रश्नावर आली भूमिका स्पष्ट केली आहे.

वैभव सोनावणे | Updated On: Jun 5, 2019 02:46 PM IST

बारामतीचं पाणी वळवण्याची भाजपची खेळी, अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बारामती, 5 जून : 'इथेही लोकच राहतात आणि तिकडेही लोकच राहतात. आता ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी ठरवावं कुणाला आणि कसं पाणी द्यायचं,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीप्रश्नावर आली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याबाबत सरकार करत असलेल्या हालाचालींवरून राज्यात आता राजकारण तापू लागलं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असंही महाजन म्हणाले आहेत.

याबाबतच आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्हाला आता दुष्काळात राजकारण करायचं नाही. दुष्काळात प्राथमिकता लोकांना पाणी देण्याची आणि जनावर जगवण्याची आहे. आता बाकीचे प्रश्न आणि नंतर राजकारण नंतर,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्याकडून चारा छावण्यांना भेट देण्यात आली. तसंच दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

'पाऊस पडेपर्यंत नाहीतर नवा चारा तयार होईपर्यंत जनावरांसाठी चारा छावण्या चालवाव्या लागतील. याबाबत सरकार विनंती करू,' असं आश्वासन शरद पवार यांनी उपस्थितांना दिलं आहे.


SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close