सुप्रिया सुळेंनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांनी फेसबुकवरून मांडली भूमिका

सुप्रिया सुळेंनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांनी फेसबुकवरून मांडली भूमिका

राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा रंगत होती.

  • Share this:

मुंबई, 2 जून : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी चर्चा रंगत होती. याबाबत आता राष्ट्रवादीच नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'राष्ट्रवादीचं स्वतःचं असं अस्तित्व कायम आहे आणि राहील. कोणत्याही खोट्या बातम्यांना बळी न पडता आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे,' असं आवाहन फेसबुकवरून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही अजित पवार यांनी हीच भूमिका मांडली होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार, या बातम्या समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोण काय म्हणालं?

शरद पवार

शरद पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विलिनीकरणाबाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात विश्लेषणात्मक चर्चा राहुल गांधी यांच्या सोबत झाली. राज्यातील दुष्काळाच्यासंदर्भातही आम्ही बोललो. मात्र इतर विषयांवर चर्चा झाली नाही.'

सुप्रिया सुळे

'राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

उदयनराजे भोसले

देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशी चर्चा होती. यावर बोलताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे म्हणाले होते की, 'असं विलिनीकरण करायचं असेल तर आधी पक्षानं बैठक घ्यावी. सर्वांचं मत जाणून घ्यावं.'


VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या