बारामतीत अजित पवारांची सभा रंगात येताच झालं असं काही..

अजित पवारांच्या भाषणाला अडथळा झाला. त्यावेळी पवारांनी काहीवेळ आपले भाषण थांबवावे लागले. पण अशा परिस्थितीवर न बोलतील ते अजित पवार कसले? त्यांनी लगेच समयसूचकता दाखवत आपल्या खासशैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 06:17 PM IST

बारामतीत अजित पवारांची सभा रंगात येताच झालं असं काही..

जितेंद्र जाधव,

बारामती, 17 एप्रिल- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा माळेगावात सुरू होती. ही सभा रोडलगतच सुरु होती. सभा ऐन रंगात आली असतानाच अचानक रोडवरुन भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणा-या दोन गाड्या एकामागून जात होत्या. गाड्यातील साऊंडमधून भाजपचा जोरदार प्रचार सुरू होता. रोडलगतच सुरू असलेल्या सभेतील अजित पवारांच्या भाषणाला अडथळा झाला. त्यावेळी पवारांनी काहीवेळ आपले भाषण थांबवावे लागले. पण अशा परिस्थितीवर न बोलतील ते अजित पवार कसले? त्यांनी लगेच समयसूचकता दाखवत आपल्या खासशैलीत भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, 'अजित पवार काय म्हणतायेत हे ऐकायला ते आलेत. आरं अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशिल. माईकवर पण तू सांगशिल आता ती (कमळाच नाव न घेता) नको घड्याळ घड्याळ घड्याळ..'

'नरेंद्र मोदी...तुम्हाला कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं?' अजित पवारांचा सवाल

अकलूजमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींना उत्तर दिलं आहे. 'नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरून टार्गेट केलं? आता बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत,' असा घणाघात अजित पवार यांनी केला.

Loading...

'काँग्रेसने ज्याचं नाव मोदी आहे, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मला अशी टीका सतत सहन करावी लागते. काँग्रेसने मला अनेकदा माझी जात सांगणाऱ्या शिव्या दिल्या आहेत,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. याद्वारे नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत पुन्हा एकदा जातीचं कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला आहे.

'चौकीदार चोर है,' असं म्हणत राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींना लक्ष्य केलं आहे. पण मोदींनी या टीकेला आता थेट आपल्या जातीशी जोडल्याचं पाहायला मिळालं आहे.


SPECIAL REPORT: तुमच्या मोबाईलमधून टिक टॉक अ‍ॅप होणार गायब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...