खरंच कर्जमाफी झालीय का?-अजित पवारांचा सवाल

३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही. जे उत्तर आहे ते इथे द्या'

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 13, 2017 03:40 PM IST

खरंच कर्जमाफी झालीय का?-अजित पवारांचा सवाल

नागपूर,  13 डिसेंबर:  कर्जमाफीच्या प्रश्नावरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना जाब विचारला आहे. कर्जमाफीच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलं आहे.

'३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे.   तशी ती खरंच झालीये का ते सांगा.  स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही.  जे उत्तर आहे ते इथे द्या' असं अजित पवार म्हणाले.तसंच कर्जमाफीच्या वाटपावरही त्यांनी टीका केली आहे. कर्जमाफीच्या वाटपाबाबत सरकारमध्येच एकवाक्यता नाही. सुभाष देशमुख एक सांगतात, चंद्रकांत पाटील दुसरंच बोलतात मुख्यमंत्री वेगळीच कोणतीतरी घोषणा करतात, अशी टीकाही अजित पवारांनी केली आहे.

तर  दुसरीकडे कापसाच्या बोंड ओळी संदर्भातील लक्षवेधी पुढे ढकलली गेला आहे. यामुळे  विरोधक आक्रमक झाले. तर शिवसेनेतल्या हर्षवर्धन जाधवांनी ठिय्या आंदोलन केलं आहे.

बोंड अळीच्या  गंभीर प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही याबाबत सरकारनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते  राधाकृष्ण  विखे पाटिल यांनी व्यक्त केली.   या सगळ्यात तिसऱ्याही दिवशी विरोधकांनी सभागृहात गदारोळ साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close