S M L

राजकारणात हातखंडा असलेले अजित पवार खेळले विटी दांडू !

राजकारणात शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या अजित पवारांचं बारामतीत एक वेगळं रुप पाहायला मिळालं.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 3, 2018 06:05 PM IST

राजकारणात हातखंडा असलेले अजित पवार खेळले विटी दांडू !

बारामती, ता. 03 मे : राजकारणात शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या अजित पवारांचं बारामतीत एक वेगळं रुप पाहायला मिळालं. पर्यावरण दिनाचे चौतित्य साधून बारामती येथे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार अगदी वेगळ्याच अंदाजात पहायला मिळाले.

लहान मुलांना खेळताना पाहून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन अजित पवार यांच्या पत्नी युनेत्रा पवार यांनी केलं होतं. या जत्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला.

पुढच्या तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवारांनी थेट मैदानात येत विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2018 06:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close