उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अजित पवार

उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अजित पवार

मागे मी त्यांना गांडूळाची उपमा दिली होती. गांडूळ कुठून चालते हे काही कळत नाही. अशीच भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे.

  • Share this:

विकास भोसले, प्रतिनिधी

कोल्हापूर, 27 आॅक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्यावर केलेल्या टीकेची आज शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून टीका करण्यात आली. यानंतर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला चढवलाय.

बाळासाहेब ठाकरे हे महत्वाचे नेते होते. मी फक्त शहरी भाषेत वडील आणि ग्रामीण भाषेत बाप म्हणतात म्हणून बापाचं स्मारक 5 वर्षे का रेंगाळलं असा मी केलेला प्रश्न चुकीचा नव्हता. मागे मी त्यांना गांडूळाची उपमा दिली होती. गांडूळ कुठून चालते हे काही कळत नाही. अशीच भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे. आता शिवसेनेला इतक्या मिरच्या का झोंबल्या अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघात केलाय.

तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिवसेना पक्ष चालत आहे. त्यांचे अनेक खासदार आमदार मला जेव्हा भेटता तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना कशी आहे यावर चर्चा होते अशी टीकाही त्यांनी केली. मात्र आजच्या सामनातील अग्रलेखावर अजित पवारांनीही  प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

शिवसेनेच्या राम मंदिर मुद्द्यावर गेल्या काही दिवसांत अजित पवार यांनी जोरदार टीका केली होती. 'ज्यांना स्वतःच्या वडिलांचं गेल्या 5 वर्षांत स्मारक बांधता आलं नाही ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार', असा खोचक सवाल अजित पवार यांनी विचारल होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यासंबंधी आज सामनाच्या अग्रलेखातही अजित पवारांवर बाण रोखण्यात आला. 'मुतऱ्या तोंडाचे अजित पवार...!' असं म्हणत सामनातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

Loading...

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखावर संताप व्यक्त करत आज सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. उद्धन ठाकरेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चहा पाजून काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. यापुढे नेत्यांबद्दल अपशब्द लिहाल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला . 'मुतऱ्या तोंडाचे अजित पवार...!' असं म्हणत सामनातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

==============================

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2018 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...