S M L

गारपीट होणार नाही,याची हमी देता का? -अजित पवार

शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याची हमी मागता मग गारपीट आणि दुष्काळ पडणार नाही याची हमी घ्याल का ?

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 10:17 PM IST

गारपीट होणार नाही,याची हमी देता का? -अजित पवार

11 एप्रिल : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन अजित पवारांनी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याची हमी मागता मग गारपीट आणि दुष्काळ पडणार नाही याची हमी घ्याल का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केलाय.

बारामतीत पार पडलेल्या सभेत अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. उर्जित पटेलांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं म्हटले, पण यांनी बँका एनपीएमध्ये जाऊ नये म्हणून उद्योगपतींचे २ लाख ८० हजार कोटी भरले. सामान्यांच्या कराच्या पैशातूनच कर्जमाफी द्यायचीये तो पैसा काय तुमच्या बापाचा आहे का असा टोला त्यांनी आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना लगालाय. यावेळी त्यांनी अरुंधती भट्टाचार्यांवरही शेलक्या शब्दात टीका केली.

आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मागतोय आणि स्टेट बँकेच्या चेअरमन भट्टाचार्य म्हणतायत नाही नाही. अशी कर्ज माफी केल्यावर अर्थ व्यवस्था अडचणीत येईल असं म्हणणाऱ्या भाट्टाचार्य यांची मिमिक्री केली.

मुख्यमंत्र्यांना आम्ही काय सोमे गोमे आहे का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत का ?, या वक्तव्यावर, तुम्ही देणार का दुष्काळ पडणार नाही याची हमी, तुम्ही देणार का गारपीट होणार नाही याची हमी. यावर मुख्यमंत्री म्हणतायत अशी कशी देता येता येईल. म्हणतायत मग आम्ही काय सोमे गोमे आहे का असे म्हणtन राग व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 10:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close