मंत्रीही बोगस आणि पक्षही बोगस,अजित पवारांचा घणाघात

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील हजारो कोटी रूपयाची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 07:50 PM IST

मंत्रीही बोगस आणि पक्षही बोगस,अजित पवारांचा घणाघात

28 सप्टेंबर : राज्यातले मंत्रीही बोगस आणि मंत्र्यांचा पक्षही बोगस असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलीये. ते सोलापुरात बोलत होते.

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवारांनी भाजपवर सडकून टीका केली.

कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बोगस म्हणून हिणवण्याचे काम भाजपाचे मंत्री करीत आहेत. कर्जमाफीच्या निकषात जर शेतकरी बसेत नसेल तर त्याला अपात्र शेतकरी म्हणण्याऐवजी भाजपाचे मंत्री हे शेतकऱ्यांना बोगस शेतकरी म्हणत आहेत. शेतकऱ्यांना बोगस म्हणण्याचा कोणताही अधिकार भाजपाच्या मंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षाला दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी बोगस नाहीत तर सत्ताधारी भाजपचे मंत्री आणि भाजप पक्षच बोगस असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील हजारो कोटी रूपयाची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. दिल्लीश्वरांना खूष ठेवण्यासाठीच राज्य सरकार कार्यरत असल्याची टीकाही अजित पवार यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...