...आणि अजित पवारांनी सभागृहातच आणली प्लास्टिकची अंडी

प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत. त्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय असं मत अजित पवारांनी विधानसभेत व्यक्त केलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2017 04:55 PM IST

...आणि अजित पवारांनी सभागृहातच आणली प्लास्टिकची अंडी

मुंबई,4 ऑगस्ट :राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आज विधानसभेत थेट प्लास्टिकचीच अंडी आणली. शहरी भागात मोठ्या प्रमाणात अशी प्लास्टिकची अंडी विकली जात आहेत. त्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय असं मत अजित पवारांनी विधानसभेत व्यक्त केलं.

शहरी भागात विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या अंड्यांमधला आणि खऱ्या अंड्यामधला फरक लोकांना कळत नसल्याचंही अजित पवार म्हणाले. ही अंडी अजित पवारांनी विधानसभेत दाखवून त्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.

तसंच काही दिवसांपूर्वी मनोरा आमदार निवासाचा स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही अजित पवारांनी पडलेल्या स्लॅबचा तुकडा विधासभेत दाखवला होता. त्यामुळे 'घ्या पुरावा' असं म्हणत त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...