कर्जरोखे काढा, पण कर्जमाफी द्याच -अजित पवार

गेल्या अडीच वर्षात 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्यात अजून किती काळ वाट पाहणार आहात. कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार ?,

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 08:57 PM IST

कर्जरोखे काढा, पण कर्जमाफी द्याच -अजित पवार

05 एप्रिल : अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सरकार वाट पाहतंय ?, असा सवाल उपस्थितीत करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसंच कर्जरोखे काढा, पण कर्जमाफीचा निर्णय घ्या असा सल्लाही अजित पवारांनी दिला. जर कर्जमाफीचा निर्णय घेतला नाहीतर कोर्टात जाऊ असा इशाराही विरोधकांनी दिला.

संघर्षयात्रा संपल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

गेल्या अडीच वर्षात 9 हजार शेतक-यांच्या आत्महत्या केल्यात अजून किती काळ वाट पाहणार आहात. कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार ?, असा थेट सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केलाय.

कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढलाय हे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरून सिद्ध होतं. युपीच्या मॉडेलचा अभ्यास करू असं मुख्यमंत्री म्हणतात. पण मॉडेलच्या नावाखाली वेळकाढूपणा करू नये. सरकार अजूनही निर्णय घेता येत नसेल तर न्यायव्यवस्थेकडे जाण्याशिवाय पर्याय नाही असा इशाराही विखे पाटलांनी दिला.

तसंच शेतकऱ्यांचा संयम आता तुटतोय. शेतकरी कर्जमाफी तातडीने करावी. कर्जरोखे काढा, पण कर्जमाफीचा निर्णय घ्या. जे यूपीमध्ये यांच्या भाजप सरकारने करून दाखवलं ते राज्यात करावं असं अजित पवार म्हणाले. तसंच दिव्याची ऊब लागली की बरं वाटते काहींना, म्हणून प्रतोदांना लाल दिवा दिलाय असा टोलाही अजित पवार लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...