S M L

राम कदम यांचं नाव 'रावण' कदम ठेवा - अजित पवार

Updated On: Sep 8, 2018 08:14 PM IST

राम कदम यांचं नाव 'रावण' कदम ठेवा - अजित पवार

शिर्डी, 08 सप्टेंबर : राम कदम यांचे नाव बदलून रावण कदम ठेवायला पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. अहमदनगरच्या अकोले येथे शेतकरी मेळाव्यात त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारवरही सडकून टीका केली आहे. रामाला सुद्धा वाटत असेल याचं नाव राम कसं ठेवलं अशा प्रकारचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. त्यांची ही भाषा भाजपाला शोभते का ..? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय.

राम कदम सारख्या आमदारांचा बंदोबस्त जनतेनेच करायलाच हवा असंही अजित पवार यांनी म्हणटलंय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 'मला नाही अब्रु, मी कशाला घाबरू' अशा प्रकारचं हे सरकार असून आजवर दिलेलं कोणतही आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

मोदी हे 'एकटा जिव सदाशिव' आहेत. मोदी एकटेच असल्यानं कुटंब काय असतं हे त्यांना माहीतच नाही. कुटुंबासाठी खर्च काय असतो याची कोणतही माहीती मोदींना नाही. त्यामुळे आज देशातील जनता महागाईने त्रस्त आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदींवर जोरदार तोफ डागली आहे.

संभाजी भिडे हे या सरकारचंच पिल्लू आहे. मनुस्मृतीचा विचार घेऊन हे सरकार काम करत असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. दाभोलकर आणि पानसरे सारख्यांची हत्या करणारे कोण आहेत ? याचा मास्टरमांईड कोण आहे याचा शोध घ्यायला हवा असंही अजित पवार म्हणाले आहेत.

 

Loading...
Loading...

VIDEO: आमदार रवी राणा यांच्या दहीहंडीत अश्लील नृत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2018 08:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close