News18 Lokmat

'शरद पवार जेव्हा निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील'

'पवारांची माघार हा भाजपचा पहिला विजय' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 09:04 PM IST

'शरद पवार जेव्हा निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील'

खोपोली, 13 मार्च : शरद पवार ज्यावेळेस पहिले निवडून आले, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रायमरी स्कुलमध्ये असतील असा टोला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. 'पवारांना हवा कळते, पवारांची माघार हा भाजपचा पहिला विजय' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते खोपोलीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

'शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. 1984 मध्ये शरद पवार हे नंबर 2 च्या मताधिक्याने निवडून आले होते. शरद पवार ज्यावेळेस पहिले निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कुलमध्ये असतील' असं अजित पवार म्हणाले. '1967 पासून 14 निवडणुकीत पवार साहेबांनी कधी अपयश पाहिलेलं नाही. त्यानंतर भाजपच्या फक्त 2 जागा आल्या होत्या.' असंही पवार म्हणाले.

पवारांची माघार म्हणजे भाजपचा पहिला विजय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांची निवडणुकीतून माघार म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते की, शरद पवारांना बदललेल्या हवेचा लवकर अंदाज येतो, त्यानुसारच त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

शरद पवार उभे राहणार नाहीत

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. त्या आधी त्यांनी बारामती हॉस्टेलला माढातल्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी आपण उभे राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.


VIDEO :...आणि तरुणी म्हणाली 'Hi Rahul'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...