News18 Lokmat

पत्नीच्या जाचामुळे गेले माझे केस, अजित पवारांची टोलेबाजी

बारामतीतल्या मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार यांनी फारसा फेटा न बांधण्याचं रहस्य सांगितलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2018 07:54 PM IST

पत्नीच्या जाचामुळे गेले माझे केस, अजित पवारांची टोलेबाजी

13 जानेवारी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे त्यांच्या बेधडक आणि मिश्कील वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. फेटा न बांधणे आणि केसं का गेले याबद्दलचा खुलासाच  अजित पवारांनी जगजाहीर करून टाकला.

बारामतीतल्या मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघाच्या वतीने आयोजित  एका कार्यक्रमात अजित पवार यांनी फारसा फेटा न बांधण्याचं रहस्य सांगितलं.

'मी कधी फेटा बांधत नाही तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही फेटा बांधल्यावर मलाही राहवलं नाही, म्हटलं बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस पण गेले अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

ते एवढ्यावरच थांबले नाहीतर माझे केसे हे पत्नी सुनेत्रामुळे सुद्धा गेले, मी तिला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता असं म्हणताच सभागृहात एक हश्या पिकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...