07 आॅगस्ट : आज रक्षाबंधन. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. सर्वसामान्य असोत, नाहीतर सेलिब्रिटीज. भावाबहिणीचं अतूट प्रेम सगळीकडे सारखंच.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केले.सुप्रिया सुळेंनी आपल्या भावंडासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पवार कुटुंबीयातली सगळी भावंड एकत्र आल्याचं फोटोमधून दिसतंय.
आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgFHqyRsKF
— Supriya Sule (@supriya_sule) August 7, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा