अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल

अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल

याप्रकरणी त्यांच्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने शुक्रवारी पहाटे आशाताई कांबळे यांना धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Share this:

15 डिसेंबर: क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. दरम्यान याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी त्यांच्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने शुक्रवारी पहाटे आशाताई कांबळे यांना धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. कागलमध्ये रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडलाय.

जखमी झालेल्या आशाताई कांबळे यांना एका युवकाने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. अपघाताच्यावेळी नेमके कोण गाडी चालवत होते ते स्पष्ट झालेलं नाही. पण अजिंक्यचे वडिल मधुकर बाबूराव रहाणे (54) यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती आहे. रहाणे सहकुटुंब कोल्हापूरमार्गे मुंबईहून तारकर्लीला चालले असताना कागल येथे हा अपघात घडलाय.

दरम्यान आशाताई कांबळे या इचलकंरजीमधील शहापूर येथील सावित्रीनगर येथे रहात होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 11:03 AM IST

ताज्या बातम्या