अजिंठा लेणी परिसरात दारु आणि हुक्का पार्ट्या, नशेखोरांचा हैदोस

अजिंठा लेणी परिसरात दारु आणि हुक्का पार्ट्या, नशेखोरांचा हैदोस

या नशेखोरांमुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या विशेष करून महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

  • Share this:

सचिन जीरे, औरंगाबाद 16 जुलै : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात टवाळखोरांच्या दारू आणि हुक्का पार्ट्या रंगत आहेत. या नशेखोरांचा देशी आणि विदेशी पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. जागतिक वारसा असलेल्या या पर्यटनस्थळावर नशेखोरांच्या या त्रासाविरुद्ध आता नागरिकांनी तक्रारी केल्या असून दबावामुळे पोलीस प्रशासन जागं झालंय. दारु आणि हुक्का पिणाऱ्या टोळक्यांचा पोलीस शोध घेताहेत.

बीबी का मकबरा, अजिंठा, वेरूळ लेणी, पाणचक्की, देवगिरी किल्ला, अशा विविध ऐतिहासिक स्थळामुळे औरंगाबाद हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एतिहासिकदृष्ट्या या जिल्ह्याला जगभरात मोठं महत्व असल्यानं देश विदेशातील पर्यटक औरंगाबादेत येत असता मात्र टावळखोरांमुळे पर्यटकांना अशा ऐतिहासिक पर्यटनस्थळावर त्रास सहन करावा लागतोय.

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स

नशेखोरांवर कारवाईची मागणी

या नशेखोरांचा एक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरलही झालाय. त्यात लेणी परिसरात 10 ते 12 जणांचे टोळके हे कुठलीही भीती न बाळगता बिनधास्तपणे हुक्का पिताना दिसत आहे. हा सर्व प्रकार खुलेआमपणे सुरू आहे मात्र या टावळखोरांना रोखण्यासाठी पर्यटन विभाग किंवा पोलीस कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. या मुळे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या विशेष करून महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. वेळीच काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर अशा मद्यपी आणि टवाळखोरांकडून मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

पोलिसांची शोध मोहिम

अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी दखल घ्यायला सुरुवात केलीय. अजिंठा लेणी परिसरात हुक्का पिताना व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधल्या तरुणांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. अजिंठा लेणी परिसरात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊन कुणीही कायदा मोडू नये यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त लेणी परिसरात वाढवली जाणार असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 06:02 PM IST

ताज्या बातम्या