नगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा आणि सुनेचा पराभव

याही निवडणुकीत जनतेने कुठल्याही एका पक्षाला कौल दिलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. तर शिवसेनेने भाजपवर आघाडी घेतलीय.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 03:08 PM IST

नगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा आणि सुनेचा पराभव

अहमदनगर, नगर, 10 डिसेंबर :नगरचे भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांना मोठा राजकीय धक्का बसलाय. त्यांचा मुलगा सुवेंद्र आणि सून दीप्ती यांनी लोकांनी नाकारलं. सुवेंद्र यांचा प्रभाग 11 (ड) मधून तर त्यांच्या पत्नी दीप्ती यांचा 12 (ब) मधून पराभव झाला. सुवेंद्र यांना राष्ट्रवादीच्या शेख नजिर अहमद यांनी पराभूत केलं तर दीप्ती यांना शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा कदम यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

याही निवडणुकीत जनतेने कुठल्याही एका पक्षाला कौल दिलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. तर शिवसेनेने भाजपवर आघाडी घेतलीय.


अहमदनगरमध्ये महापालिकेसाठीच्या चौथ्या निवडणुकीत जवळपास 70 टक्के मतदान झालंय. इथं भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. नगरला 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात होते. 2003 मध्ये अस्तित्वात आलेल्या महानगर महापालिकेच्या आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. 2003, 2008 व 2013 या तिन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही.


Loading...

निवडणुकीतली घराणेशाही


या निवडणुकीत  339 उमेदवार रिंगणात होते. यावेळी  सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीटं दिल्यानं निडणुकीतली चुरस वाढली होती. या   निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी, सून दीप्ती गांधी महापालिकेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप, कर्डिलेंची दुसरी कन्या ज्योती गाडे देखील रिंगणात उतरल्या होत्या.


2013 चं बलाबल


महानगरपालिकेच्या 2013 मध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. लोकांनी कुठल्याही एका पक्षाच्या हाती सत्ता न देता  त्रिशंकू पालिकेसाठी कौल मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 18, भाजप 9, काँग्रेस 11, मनसे 4, तर अपक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...