Elec-widget

अहमदनगर महापालिका निवडणूक : शिवसेनाच मोठा भाऊ, भाजपला धक्का

अहमदनगर महापालिका निवडणूक  : शिवसेनाच मोठा भाऊ, भाजपला धक्का

थोड्याच वेळात अहमदनगर महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

अहमदनगर, 10 डिसेंबर : अहमदनगरमध्ये महापालिकेसाठीच्या चौथ्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. सध्यातरी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या निवडणुकीतील ताजी आघाडी हाती आली आहे.

शिवसेना - 22

राष्ट्रवादी - 20

भाजप - 14

कॉंग्रेस - 4

Loading...

बसप - 4

सपा - 1

अपक्ष - 3

नगरमध्ये जवळपास 70 टक्के मतदान झालं होतं. इथं भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. या ठिकाणचे 41 मतदान केंद्र हे अति संवेदनशील म्हणून घोषित झाले होते.नगरला 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. 2003 मध्ये अस्तित्वात आलेल्या नगर महापालिकेच्या आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. 2003 2008 आणि 2013 या तिन्ही निवडणुकांतून कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...