नगर महापालिका निवडणूकीत घराणेशाही, नेत्यांचा 'गोतावळा' रिंगणात

नगर महापालिका निवडणूकीत घराणेशाही, नेत्यांचा 'गोतावळा' रिंगणात

या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीटं दिल्यानं निडणुकीतली चुरस आणखी वाढली आहे

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर, ता.9 डिसेंबर : अहमदनगर महानगर पालिका निवडणुकां मध्ये  339 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीटं दिल्यानं निडणुकीतली चुरस आणखी वाढली आहे. या   निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी पुत्र सुवेंद्र गांधी, सुन दीप्ती गांधी महापालिकेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या तथा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप, कर्डिलेंची दुसरी कन्या ज्योती गाडे देखील रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज या सगळ्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.


श्रीपाद छिंदमही रिंगणात

वादग्रस्त श्रीपाद छिंदम नगरसेवक असून त्याने यापूर्वी उमहापौरपदावरही काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर त्याच्या विरोधात राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. परंतु, छिंदमने महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष म्हणून उडी घेतलीय. त्याच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष आहे. या व्यतिरिक्त काही अपक्ष उमेदवार झुंज देणार आहेत.


या आहेत महत्वाच्या लढती


निवडणुकीच्या रिंगणात महापौर सुरेखा कदम विरुद्ध दीप्ती गांधी, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे विरुद्ध संजय घुले, पुष्पा बोरुडे विरुद्ध सोनाली सुडके, श्रीपाद छिंदम विरुद्ध अनिता राठोड, सुरेश तिवारी, सभापती बाबासाहेब वाकळे विरुद्ध अर्जुन बोरुडे, सुवेंद्र गांधी विरुद्ध शेख नजीर अहमद, सभापती सारिका भुतकर विरुद्ध आरती बुगे,


अनिल शिंदें विरुद्ध दत्ता गाडळकर, मनोज कोतकर विरुद्ध दिलीप सातपुते, शीतल जगताप विरुद्ध संगीता गांधी विरुद्ध सुरेखा भोसले, ज्योती गाडे विरुद्ध वंदना कुसळकर विरुद्ध कमल दरेकर यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.


2013 चं बलाबल


महानगरपालिकेच्या 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता निवडणूक त्रिशंकू ठरली होती. त्यावेळी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 18, भाजप 9, काँग्रेस 11, मनसे 4, तर अपक्ष 8 निवडून आले होते. परंतु, 2018 च्या निवडणुकीत या बलाबलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.


 

Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 09:13 AM IST

ताज्या बातम्या