अहमदनगरमध्ये मुस्लीम जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगरमध्ये मुस्लीम जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यात लोहगावात मुस्लिम जातपंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय. घटस्फोटीत मुलीशी लग्न केलं म्हणून गेल्या 6 वर्षांपासून या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलंय.

  • Share this:

06 एप्रिल: महाराष्ट्रात जात पंचायतीचा जाच सुरूच असल्याचं समोर आलंय. अहमदनगर जिल्ह्यात लोहगावात मुस्लिम जातपंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय. घटस्फोटीत मुलीशी लग्न केलं म्हणून गेल्या 6 वर्षांपासून या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलंय. हे कुटुंब उपेक्षीताचं जगणं जगतायत. दरम्यान जातपंचायतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लिम समाजातील वाघवाले जमातीची ही जातपंचायत आहे. लोणी पोलीस ठाण्यात सात जातपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्लीम समाजातील वाघवाले समाजाच्या कुटूंबाला जातपंचायतने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . अहमदनगर जिल्ह्यातील दोन परिवार आज जातपंचायतमुळे बहिष्कृताचं असह्य जिवन जगतायत. जात पंचायतीच्या विळख्यात आजही अनेक कुटूंब भरडली जातायत.

लोहगावमधील आयेशा अली शेख हीने बालवयात झालेल्या लग्नानंतर आयेशाने काही वर्षे संसार केला आणि सासरी जाच होत असल्याने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला . त्यनंतर माहेरी लोहगाव येथे राहायला आल्यावर आयेशाचे अली बरोबर सुत जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला जातपंचायत आडवी आली आणि जातपंचायतने त्यांना लग्न करायचे असेल तर दिड लाख दंड भरावा लागेल असं सांगितलं तसंच 20 च्या दंडाची शिक्षा सुनावली. 20 चा दंड म्हणजे काय तर ... घटस्फोटीत मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा विधी करायचा.. चाळीसावा घालायचा आणि या जोडप्याने समाजापासून दूर राहायचं. समाजातून बहिष्कृत केलेल्या या परिवारासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही किंवा कार्यक्रमासही बोलवायच नाही. अशा प्रकारचं आयुष्य गेली सहा वर्षे हि आयशा आणि अली जगत आहेत. लोहगावला स्वतःचं घरही आहे मात्र आपलं घर सोडून दुसऱ्या गावात उपेक्षिताचं जीवन जगण्याची वेळ या दोघांसह परिवारावर आलीय..

आता या सात जातपंचांना शिक्षा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 05:21 PM IST

ताज्या बातम्या