पाथर्डीमध्ये एसटी चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

या एसटी चालकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एसटी चालकाला जबर मारहाण केली असून यामध्ये चालक जखमी झालाय तर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या मारहाण प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2018 03:08 PM IST

पाथर्डीमध्ये एसटी चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

अहमदनगर, 25 जून : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी शिवारात किरकोळ कारणावरून एसटी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. या एसटी चालकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून एसटी चालकाला जबर मारहाण केली असून यामध्ये चालक जखमी झालाय तर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या मारहाण प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

...जेव्हा कोसळतो पाऊस !

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

वडाळ्यात दोस्ती एकर्सच्या इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळली

पाथर्डी आगाराची बस क्रमांक एम एच १४ बी टी ११५९ ही मांडवा मार्गे नगरला जात होती. साडेचारच्या सुमारास जोहारवाडी येथे रस्त्यावरील खड्ड्यांत टँकर गेला असल्यामुळे त्या रस्त्यावर लोक जमा झाले होते. त्यामुळे बस तिथं थांबली. दरम्यान तीन ते चार चार बस चालकाला शिवीगाळ केली. बस चालक रोहिदास पालवे यांनी काहाही न बोलता बस पुढे नेली.

मात्र दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडे दहा वाजता बसचालक रोहिदास  पालवे आणि वाहक आशा सुभाष बुळे हे पांढरीपूलमार्गे परत पाथर्डी येथे परतत असताना जोहारवादी शिवारात कौडगाव आठरे येथील आरोपी लक्ष्मण आठरे, राजेंद्र आठरे आणि इतर दहा ते पंधरा लोकांनी मोटार सायकलवर येत बसवर दगडफेक केली आणि बसचालक रोहिदास पालवे यांना बसमधून खाली उतरवत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close