नगरमधील निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नगरमधील निंबोडी शाळा दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी दुर्घटनेत दगावलेल्या वैष्णवी पोटे हीचे वडील प्रकाश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

01 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी दुर्घटनेत दगावलेल्या वैष्णवी पोटे हीचे वडील प्रकाश पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केंद्रप्रमुख भोर, गटशिक्षण अधिकारी रामदास हराळ, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, मुख्याध्यापिका निर्मला वसंत दातीर, बांधकाम करणारे तत्कालीन ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

निंबोडी दुर्घटनेत त्यांच्या मुलीसह तीन बालकांचा मृत्यू झाला तर  १८ बालके जखमी झाले होते. शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते.

मुळात जो वर्ग पडला, तो आधी स्टोअर रुम म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यदिनानंतर तेथे वर्ग भरवायला सुरूवात झाली. खोल्यांची परिस्थिती पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख भोर, गटशिक्षणाधिकारी हराळ, गटविकास अधिकारी गारुडकर मुख्याध्यापिका दातीर यांच्यावर होती. या अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. केव्हाही पडेल अशा अवस्थेत असलेल्या वर्गात मुलांना बसवले. त्यामुळे मुलांच्या बळी जाण्याला अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2017 07:31 PM IST

ताज्या बातम्या