S M L

राष्ट्रवादीचा आज जामखेड बंद, पोलिसांचा धाक संपला-धनंजय मुंडे

जामखेडमधील राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जामखेड बंदची हाक दिलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुडाच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 29, 2018 10:30 AM IST

राष्ट्रवादीचा आज जामखेड बंद, पोलिसांचा धाक संपला-धनंजय मुंडे

अहमदनगर, 29 एप्रिल : जामखेडमधील राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांच्या निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं आज जामखेड बंदची हाक दिलीय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुडाच्या राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

या हत्या म्हणजे कायदा व सुव्यवस्था संपल्याचं प्रतिक असून पोलिसांचा धाक संपला अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय. तर घटनेची सखोल चौकशी करून आरोपींच्या मुसक्या आवळा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय.

काय आहे प्रकरणबीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजता अज्ञात व्यक्तींनी गोळीबार गेला. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी राळेभात या दोघांची हत्या करण्यात आली.

मोटार सायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आल्या होत्या. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश आणि राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. दोघांना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close