S M L

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या

यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी राळेभात या दोघांची हत्या करण्यात आली.

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 11:06 PM IST

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या

अहमदनगर, 28 एप्रिल : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर जामखेडमधील राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याची घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्ससमोर शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजता अज्ञात व्यक्तींनी गोळीबार गेला. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी राळेभात या दोघांची  हत्या करण्यात आली.

मोटार सायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश आणि राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. दोघांना नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 11:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close