अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत घोळ, पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांचे ट्वीट

अहमनगरची जागा राष्ट्रवादीने सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडल्यावरून मतमतांतरे

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 09:51 AM IST

अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत घोळ, पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांचे ट्वीट

मुंबई, 02 मार्च : काँग्रेस राष्ट्रवादीत अहमदनगर लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. राष्ट्रवादीने ही जागा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवासाठी सोडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचे खंडन केलं आहे. असा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना अहमदनगरची जागा ही काँग्रेससाठीच असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नगरमधून सुजय विखे पाटलांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होती. तसेच अहमदनगरच्या बदल्यात राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा आपल्याकडे घेतल्याचंही म्हटलं जात होतं.

लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. नगरची जागा मिळत नसल्यामुळे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा सुजय विखे - पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. जवळपास सुजय विखे पाटील यांनी अपक्ष लढवण्याचीही तयारी केली. त्यानंतर, आता शरद पवार यांनी नगरची जागाही काँग्रेससाठी सोडणार असल्याच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा अहमदनगरच्या जागेचा तिढा निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या अहमदनगरच्या जागेवर डॉ. सुजय विखे यांनी दावा करुन प्रचार सुरु केला होता. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे ˆ पाटील यांनीही यासाठी राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होती. तरीही राष्ट्रवादीकडून सकारात्मक उत्तर न आल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना यासाठी विनंतरी केली होती. यावर शरद पवार यांनी ही जागा सुजय विखेंसाठी सोडली असल्याचे अकलूज येथे बोलताना स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र या वृत्ताचे खंडन करत असा निर्णय झालाच नसल्याचे म्हटले आहे.

Loading...

नगरमध्ये का झाला वाद निर्माण?

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा लढवत असली तरीही भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधींनी ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नगरची जागा सोडण्यासाठी तयार नव्हतं. त्यापूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेत उमेदवारीचे संकेत दिले. अनुराधा नागवडे यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...