अहमदनगरमधलं 'ते' स्फोटक कुरिअर सरहदच्या संजय नहार यांच्यासाठी होतं

अहमदनगरमधलं 'ते' स्फोटक कुरिअर सरहदच्या संजय नहार यांच्यासाठी होतं

काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांच्यासाठी ते स्फोटक कुरिअर आलं होते.

  • Share this:

21 मार्च : अहमदनगर स्फोट प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधलं हे स्फोटक पार्सल संजय नहार यांच्यासाठी आलं होतं. संजय नहार हे सरहदचे संस्थापक आहे. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काम करणाऱ्या संजय नहार यांच्यासाठी ते स्फोटक कुरिअर आलं होते.

अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या माळीवाडा भागातील मारूती कुरिअरच्या कार्यालयात पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्पीकर बॉक्सच्या पार्सलमध्ये हा स्फोट झाला आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कुरिअर ऑफिसमध्ये एकूण 3 जण काम करत होते. या दुर्घटनेत संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर जखमी झाले आहेत.

अहमदनगरच्या एका व्यक्तीनं पुण्याला पाठवण्यासाठी हे पार्सल मारुती कुरिअरच्या कार्यालयात आणून दिलं होतं. दरम्यान या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

आता संजय नहार यांना हे पार्सल कोणी आणि का पाठवलं होतं याकडेच पोलिसांचा तपास असणार आहे. यातून नहार यांच्या जीवाला घोका तर नाही ना अशा असंख्य प्रश्नांचा पोलीस सध्या तपास घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 11:17 AM IST

ताज्या बातम्या