29 मे : अहमदनगरमध्ये आंब्याच्या झाडावर एका देठाला 32 कैऱ्या आल्यात. राहुरी तालुक्यात निसर्गाची ही अदभूत किमया पाहायला मिळाली आहे.
देवाची करणी.. या म्हणी प्रमाणेच वळण तालुका राहुरी इथं आंब्याच्या झाडावरील एकाच देठाला तब्बल ३२ कैऱ्या लगडल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाच्या एका देठाला २-३ कैऱ्यांचा घड लागण्याची शक्यता असते. मात्र या झाडाच्या देठाला ३२ कैऱ्या लागल्याने चर्चा सुरू आहे.
वळण येथील पोपट भाऊसाहेब खुळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या एकाच देठाला एवढ्या कैऱ्यांचा घड लागल्याची निर्सगाची ही आश्चर्यकारक किमया पहावयास मिळाली आहे. दहा वर्षांपूर्वी खुळे यांनी आपल्या शेताच्या बांदावर आंब्याच्या कोयीचे रोपण केले होते. या आंब्याचे रोपाची सहा वर्षानंतर वटवृक्षा प्रमाणे वाढ झाली. गेल्या ३ वर्षांपासून या झाडाला फळधारणा सुरू झाली असली तरी एका घडाला २ ते ३ ही मर्यादीत कैऱ्यांची संख्या पाहावयास मिळाली आहे. यंदा मात्र झाडाच्या एकाच देठाला तब्बल पस्तीस कैर्या आल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे.
आंब्याच्या झाडावरील एकाच देठाला बहुसंख्येने आलेल्या कैऱ्याचा घड पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या खुळे यांच्या शेतीवर भेटी सुरू झाल्या आहेत. राहुरीला देश पातळीवर कृषी संशोधन करणारे विद्यापीठ अस्तित्व आहे. मात्र, झाडाच्या एका देठाला ३२ कैऱ्या लागल्याचे शेतकऱ्यांना पाहावयास मिळालेले नाही. आंब्याच्या झाडाला डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोहोर लागण्यास सुरुवात होते. आंब्याच्या झाडाला फळधारणा होईपर्यंत मोहोर गळाला नसल्याने एकाच देठाला बहुसंख्येने फलधारणा झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा