Elec-widget

GOOD NEWS : शेतीच्या 'या' योजनांसाठी 1 लाख 55 हजार कोटीचं पॅकेज जाहीर

GOOD NEWS : शेतीच्या 'या' योजनांसाठी 1 लाख 55 हजार कोटीचं पॅकेज जाहीर

राज्यातल्या सिंचन प्रकल्पासाठी आणि शेतीच्या वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्रानं 1 लाख 55 हजार कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर केलंय.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : महाराष्ट्राच्या बळीराजाला संजीवनी देणारी बातमी आहे. राज्यातल्या सिंचन प्रकल्पासाठी आणि शेतीच्या वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्रानं 1 लाख 55 हजार कोटी रूपयांचं पॅकेज जाहीर केलंय. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही गूड न्यूज दिली. 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी हे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलंय.

राज्यात रखडलेले 91 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यात विदर्भातील 6 आणि मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यातील प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती गडकरींनी दिली. तसंच राज्याची जलसिंचनाची क्षमता दुप्पट म्हणजे 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहचेल असा विश्वास देखील गडकरींनी व्यक्त केला. याशिवाय 2 नदी जोडो प्रकल्पासाठी पंतप्रधान जलसिंचन योजनेतून 75 हजार कोटी रूपये जाहीर करण्यात आले आहेत.

तुमच्या पगारात होणार कपात,सॅलेरी स्लिपही बदलणार ?

एकूण पॅकेज - 1 लाख 55 हजार कोटी

14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी निधी - 13 हजार 651 कोटी

Loading...

मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांना विशेष निधी

91 जलसिंचन प्रकल्प - 40 हजार कोटी

3 लाख 77 हजार हेकटर जमीन ओलिताखाली येणार

युती सरकारच्या काळात रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

'नार-पार-तापी', 'दमनगंगा-पिंजाळ' नदी जोडो प्रकल्प- 75 हजार कोटी

विदर्भाला काय मिळालं?

अमरावती - 18 प्रकल्प

अकोला - 7 प्रकल्प

वाशिम - 18 प्रकल्प

यवतमाळ - 14 प्रकल्प

बुलडाणा - 8 प्रकल्प

वर्धा - 1

मराठवाड्याला काय मिळालं?

औरंगाबाद - 5 प्रकल्प

जालना - 6 प्रकल्प

नांदेड - 2 प्रकल्प

लातूर - 3 प्रकल्प

बीड - 1 प्रकल्प

हेही वाचा...

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...