• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: या' कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी आणखी वाट पाहावी लागणार
  • VIDEO: या' कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी आणखी वाट पाहावी लागणार

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 08:34 AM IST | Updated On: Mar 12, 2019 08:49 AM IST

    12 मार्च : कृषी क्षेत्राची मदार बाजारपेठेवर पडल्यापासून शेतकऱ्यासमोरील आव्हान वाढत चाललं आहे. पण, पिकाच्या मूल्यवर्धनाबरोबर कमी खर्चात उत्तम शेती आणि चांगला भाव मिळावा यासाठी आयआयटीने संशोधन सुरू केले आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होतं. भरपाईसाठी ४.५९ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात गहू आणि कांद्याचे पीक मुबलक प्रमाणात आले आहे. मार्च महिन्याच्या अखेर पासून ते एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पिके काढणीस सुरुवात होईल. विदर्भासह राज्याच्या सर्वच भागात शेतकरी दुष्काळी मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; अकोल्याच्या पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी