Elec-widget

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना कृषीमंत्री गहिवरले

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना कृषीमंत्री गहिवरले

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यातील अश्रुंच्या धारा पाहून कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनाही अश्रू अनावर झाले होते.

  • Share this:

अमरावती, 3 जून- आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांशी बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यातील अश्रुंच्या धारा पाहून कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनाही अश्रू अनावर झाले होते.

अमरावती येथे गॅलक्सी फाऊंडेशनतर्फे विमलाबाई देशमुख सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम रविवारी झाला. त्यावेळी हा भावपूर्ण प्रसंग घडला. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीच्या डोळ्यांतील अश्रु पाहून कृषीमंत्र्यांना गहिवरुन आले. त्यांन अश्रू आवरणे कठीण झाले. नंतर कृषीमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. हा प्रसंग पाहून संपूर्ण सभागृहच यावेळी भावूक झाले होते.

शेतकरी कुटुंबांशी संवाद साधताना कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, जीवन अतिशय सुंदर आहे. जीवनात अनेक खडतर प्रसंग येत असतात. त्यातून वाट काढून आपण दु:खावर मात करायला हवी. आज माझ्या बहिणींच्या डोळ्यांत अश्रू आहेत. या स्थितीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळायला हवे. आत्महत्येसारखे प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची गरज असल्याचेही यावेळी कृषीमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एकूण 41 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सोयाबीन बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नंदकुमार कुइटे यांच्या वतीने कपाशी बियाण्याच्या 60 बॅग संस्थेच्या उपक्रमासाठी सुपुर्द करण्यात आल्या.

राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जातेय- कृषीमंत्र्यांचा आरोप

Loading...

मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा गंभीर आरोप कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाईल, हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे. या बोगस खतांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असेही कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले. असे प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्या नंबरवर माहिती द्यावी. ती माहिती गुप्त ठेवून तातडीने भरारी पथक पाठवून छापा मारण्यात येईल, असेही कृषी मंत्री बोंडे यावेळी म्हणाले.

हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; भाजप आमदार थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...