शिवसेनेच्या बैठकीत कृषीतज्ज्ञ किशोर तिवारींनी सरकारचे काढले वाभाडे

आपल्यालाही मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री पदाचा लॉलीपॉप दिला होता, असा गोप्यस्फोटही यावेळी तिवारींनी केला आहे. मात्र आपण जनतेला उत्तरदायी आहोत, असं सांगून सरकारला झोडतच राहणार असेही तिवारी यांनी सांगितले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 08:06 PM IST

शिवसेनेच्या बैठकीत कृषीतज्ज्ञ किशोर तिवारींनी सरकारचे काढले वाभाडे

मुंबई, 26 जून- कृषीतज्ज्ञ किशोर तिवारी यांनी शिवसेनेच्या बैठकीत चक्क सरकारचे वाभाडे काढले आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. आपल्यालाही मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री पदाचा लॉलीपॉप दिला होता, असा गोप्यस्फोटही यावेळी तिवारींनी केला आहे. मात्र आपण जनतेला उत्तरदायी आहोत, असं सांगून सरकारला झोडतच राहणार असेही तिवारी यांनी सांगितले आहे.

42 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी छोट्या छोट्या कारणांनी अडवली जात आहे. सरकारने पीक कर्जाचे पैसे बँकांना दिले, मात्र तांत्रिक कारणांमुळे बँकांनी 60 टक्के शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडवून ठेवले आहेत. यावर गंभीरपणे चर्चा करण्याची वेळ आली आहे. यावर आपणच इथेही बदडू शकतो आणि तिथेही बदडू शकतो.

अन्नसुरक्षा अभियान ही लोकप्रतिनिधींनी चळवळ करायला हवी. एकही शेतकरी- वंचित उपाशी राहता कामा नये,राज्यात 10 हजार कोटींची दवाखान्याची भूमिपूजन झाले पण एकही दवाखाना सुरू नाही, असा गंभीर आरोप तिवारी यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला. तिवारी यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मी दाद देतो पण धोरणात्मक बदल झाले पाहिजे. ते थर्ड पार्टी इंटर्व्हेन्शननेच होऊ शकते आणि हे आपण करू शकतो.

सेनेच्या आमदार-मंत्र्यांना अपमानित केले..

नापिकी झाली तर तालुका, जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंनी आमचे ऐकून घ्यायला बोलावले, याबद्दल मी आभारी आहे. पण सरकारने मला राज्यमंत्री पद दिले मात्र कोणी ऐकूनच घेत नाही. टीव्हीवाले मला सल्लागार म्हणतात, पण सरकारमध्ये आमचा सल्ला घ्यायलाच तयार नाही. आता तुमचे मनोमिलन झाले ठीक आहे. पण या माझ्या सेनेच्या आमदार-मंत्र्यांना खूप अपमानित केले गेले.

Loading...

या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना समुद्रात टाकून द्यावं असं मला वाटतं. सर्व कृषी अधिकारी परदेशी वाऱ्या करून आले, पाऊस पडायचे धंदे सुरू आहेत. त्यापेक्षा लोकांना पैसे द्या, मीठ जाळून तेच पाऊस पाडतील.मी पाहिलंय, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर लॅपटॉप घेऊन येतात, प्रेझेन्टेशन देतात आणि खूप चर्चा करतात, होत काहीच नाही, अशा शब्दांत किशोर तिवारी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मान्सून आला पण पाऊस बेपत्ता, दुबार पेरणीचं संकट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2019 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...