कृषी विभागाचा दणका, बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

कृषी अधिकारी आणि निरीक्षकांनी वजनी मापे कार्यालयाची संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतलीय यामुळे कृषी दुकानांदाराचे धाबे दणाणले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 10:00 PM IST

कृषी विभागाचा दणका, बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

सुरेश जाधव, बीड 27 जून :  दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याने पई पई गोळा करुन पेरणी साठी जमवलेल्या पुंजी वर  कृषी दुकानदार डल्ला मारत असल्याचं समोर आलंय. बीड तालुक्यातील नेकनूर येथे बोगस बियाणे आणि चढया भावने खत बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कृषी विभागाने धाड टाकली या धाडीत जुन्या खताचा 23 टन स्टॉक आढळूनआलाय. या जुन्या खताची शेतकऱ्याला चढया भावाने विक्री केली जातअसल्याचं उघड झालंय. अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यत बऱ्याच दुकानात शेतकऱ्यांची लुबडणूक होते आहे.

बीड तालुक्यातील आंबील वडगाव चे शेतकरी गणेश जाधव हे नेकनूर येथील कृष्णा कृषीसेवा केंद्रावर खत खरेदी साठी गेले असता  8 बॅगची सरदार (Aps 20:20:0:13) या 50 खताची किंमत-एम आर पी प्रमाणे -813 मात्र विक्री 1065 रुपयाने पावती देण्यात आली. यावेळी गणेश जाधव यांनी दरांबद्दल प्रश्न विचारला तर भाव हाच आहे घ्याची तर घ्या नाहीतर बाहेर निघा असे उद्धट उत्तर दिले. शेवटी जाधव यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर कृषी विभागाने कारवाई केली असता आज केलेल्या कारवाईत 23 टन जुनं खत आढळून आलं त्या बरोबरी इतर खतेगी  बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आल्याचं उघड झालं. अशा दुकांनांवर जप्तीची कारवाई करणार असल्याचं कृषी विभागाने म्हटलं आहे.

तालुका कृषी अधिकारी आणि निरीक्षकांनी वजनी मापे कार्यालयाची संयुक्त कारवाईची मोहीम हाती घेतलीय यामुळे कृषी दुकानांदाराचे धाबे दणाणले आहेत. अशा बेकायदा गोष्टींविरुद्ध शेतकऱ्यांनी पुढे येऊन कारवाई करावी असं आवाहनही कृषी विभागाने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...