S M L
Football World Cup 2018

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांचं आझाद मैदानातलं आंदोलन मागे

अखिल भारतीय किसान मोर्चाच्यानंतर आज नाणार प्रकल्पाविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 06:28 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर नाणार प्रकल्पग्रस्तांचं आझाद मैदानातलं आंदोलन मागे

14 मार्च : अखिल भारतीय किसान मोर्चाच्यानंतर आज नाणार प्रकल्पाविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिलं आहे. त्यामुळे आझाद मैदानावरचं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

मुंबईच्या आझाद मैदानात रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार ग्रामस्थ रिफायनरी प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं निदर्शन करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. 'मी कोणत्याच पदामागे लागत नाही. तर पद माझ्या मागे लागतं' असं नारायण राणेंनी म्हंटलं आहे.

दरम्यान, शिवसेना दुतोंडी असल्याचं म्हणत राणेंनी शिवसेनेवरही हल्ला चढवला. काहीही झालं तरी मी तुमच्या सोबत आहे असं राणेंनी यावेळी आंदोलनकर्त्यांना म्हंटलं होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन आता मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे नाणार प्रकल्प ?

- रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरजवळ रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित

- भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचा संयुक्त उपक्रम

- 3 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित

- प्रतिवर्षी 60 मिलियन टन उत्पादनाचं लक्ष्य

- प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमीन संपादनाची गरज

- 1000 एकरमध्ये स्टोरेज टँकचा प्रस्ताव

- 2023 पर्यंत रिफायनरीचं काम पूर्ण करण्याचं टार्गेट

- 15 ते 20 हजार लोकांना थेट रोजगार मिळेल असा सरकारचा दावा

- अप्रत्यक्षरीत्या 1 लाख रोजगार निर्मितीचा दावा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close