S M L

नगरसेवक संदीप पवारच्या हत्येनंतर पंढरपूर बंद

वीस मिनिटे मृतदेह रस्त्यात रोखून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आणि पवार कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले.

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2018 11:47 AM IST

नगरसेवक संदीप पवारच्या हत्येनंतर पंढरपूर बंद

पंढरपूर, 19 मार्च : नगरसेवक संदीप पवार यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दहशतीतून अजून पंढरपूरकर सावरलेले नाहीत तोच आज सकाळी काढण्यात आलेली पवार यांची अंत्ययात्रा शिवाजी चौकात रोखून नातेवाईकांनी ठिय्या मारला.मारेकऱ्यांना त्वरित अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार केल्याशिवाय करणार नाही अशी भूमिका मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष नवी मुंबईचे नगरसेवक विजय चौगुले यांनी केली.

वीस मिनिटे मृतदेह रस्त्यात रोखून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचे आणि पवार कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. या आश्वासनानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन वैकुंठ भूमीकडे रवाना झाले

आज सकाळी अकराच्या सुमारास चंद्रभागा तीरावरील वैकुंठ स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी वडार समाजातील मोठा वर्ग सहभागी झाला होता.दरम्यान कालच्या घटनेनंतर बंद झालेले पंढरपूर आजही बंद होते प्रमुख बाजार पेठेसह मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे या बंद मुळे हाल झाले पिण्याचे पाणी सुद्धा भाविकांना मिळाले नाही मंदिर परिसरातील प्रासादिक दुकाने बंद झाल्याने भाविकांना प्रसाद घेता आला नाही

Loading...

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 11:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close