S M L

आईच्या चितेशेजारीच मुलाची आत्महत्या, स्कॉर्पिओ गाडीसह घेतलं पेटवून!

लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात ही घटना घडली.

Updated On: Jan 14, 2019 06:14 PM IST

आईच्या चितेशेजारीच मुलाची आत्महत्या, स्कॉर्पिओ गाडीसह घेतलं पेटवून!

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 14 जानेवारी : आईच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच्याबाजूलाच मुलाने स्कॉर्पिओ गाडीवर डिझेल ओतून स्वत: जाळून घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात ही घटना घडली. रविवारी रात्री गजानन कोडलवाडे या तरुणाने त्याच्या आईच्या चितेजवळच स्कॉर्पिओ गाडीवर डिझेल टाकले आणि स्वत:ला आता लॉक केले आणि जाळून घेतले. या घटनेत गजाननचा जागीच मृत्यू झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गजाजनचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

तीन दिवसांपूर्वी गजाननाच्या आईचा मृत्यू झाला होता. शिवारातील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. व्यवसायाने खासगी वाहनचालक असलेल्या गजाननची दोन लग्न झाली होती. त्यामुळे कौटुंबिक कलह वाढला होता. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. गजाननने आत्महत्या का केली असावी याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत.

===================

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 05:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close