पाणीप्रश्नाला धक्कादायक वळण, जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार

पाणीप्रश्नाला धक्कादायक वळण, जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार

राज्यात पाणीप्रश्नाला धक्कादायक वळण लागलं आहे. कारण आता जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नाशिक, 25 ऑक्टोबर : राज्यात पाणीप्रश्नाला धक्कादायक वळण लागलं आहे. कारण आता जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचं आवर्तन शहापूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातला सरकारी आदेशदेखील निघाला आहे.

खरं तर वैतरणा धरणातील पाणी ठाणे, मुंबईसाठी राखीव आहे. मात्र, यंदा भावली धरणातून शहापूरला पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. पण हा आमच्या पाण्यावर दरोडा आहे असं म्हणत इगतपुरी काँग्रेस आमदार निर्मला गावीत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उद्या (26 आॅक्टोबर ) इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर याविरोधात आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात काँग्रेससोबत शिवसेनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील 97 गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. हे आरक्षण रद्द करा या मागणीसह आता आंदोलक मैदानात उतरले आहेत.

जायकवाडी प्रश्नावरील याचिकेवर तातडीनं सुनावणीस हायकोर्टाचा पुन्हा एकदा नकार दिला आहे. या सुनावणीला दुसऱ्यांदा हायकोर्टाने नकार दिला आहे. नाशिकच्या याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात विनंती केली होती पण न्या. भूषण गवईंच्या खंडपीठानं याला नकार दिला आहे.

तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी 8.9 टीएमसी पाणी सोडण्याचे अधिकृत आदेश आल्यानंतर नगरच्या पाटबंधारे विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासकीय सोपस्कार झाल्यावर कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.

मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. मात्र पाणी सोडण्याला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे. राहुरी इथे नगर मनमाड महामार्गावर स्वाभिमानी  शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेय तर सोनई येथे शेतकरी क्रांतिकारी पक्षाची बैठक सुरू आहे.

या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यावर चर्चा सुरू आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वात ठोस आंदोलन करण्यात येणार आहे.

 VIDEO: पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2018 01:57 PM IST

ताज्या बातम्या