S M L

महिलेची गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीनं केला गर्भपात

या प्रकरणी पीडित महिलेचा पती कय्युम नदाफ, डॉ. चित्रा दिवाण आणि रफिक पटेल यांच्या सह दहा जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Sep 24, 2017 08:31 PM IST

महिलेची गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीनं केला गर्भपात

मिरज, 24 सप्टेंबर : म्हैशाळ प्रकारणानंतर पुन्हा एकदा एका महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्यामुळे मिरज चर्चेत आले आहे. मिरजेतील एका विवाहितेचा पैशासाठी छळ करून, तिला जबरदस्तीने, गर्भलिंग चाचणी करून महिलेचा गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेचा पती कय्युम नदाफ, डॉ. चित्रा दिवाण आणि रफिक पटेल यांच्या सह दहा जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिरज येथील एका महिलेचे गर्भलिंग निदान करून तिच्या गर्भात मुलगी असल्यानं जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला. मिरजेतील किल्ला भागात असणाऱ्या डॉ. चित्रा दिवाण यांना पैसे देण्यात आले आणि त्यानंतर जबरदस्तीनं या महिलेचं गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात आला.

या प्रकरणी पीडित महिलेचा पती कय्युम नदाफ,  डॉ. चित्रा दिवाण, बिल्डर रफिक पटेल यांच्यासह दहा जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पति कय्युम नदाफ हा  आधीच्या गुन्ह्यात पोलिसांच्याच ताब्यात आहे. तर अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या या घटनेमुळे बदनाम झालेल्या मिरज तालुक्यात हे मोठं रॅकेटचं सक्रिय आहे का अशी भीती निर्माण झालीये.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 08:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close