स्मशानात बर्थडे साजरा केला म्हणून हिंदूत्ववाद्यांनी केलं शुद्धीकरण, भाजप नेतेही उपस्थितीत

अंधश्रद्धा असली की माणूस कोणकोणते चित्र-विचित्र प्रकार करत सुटतो, याचं एक उत्तम उदाहरण परभणीमध्ये पहायला मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 02:34 PM IST

स्मशानात बर्थडे साजरा केला म्हणून हिंदूत्ववाद्यांनी केलं शुद्धीकरण, भाजप नेतेही उपस्थितीत

पंकज क्षीरसागर, प्रतिनिधी

परभणी, 25 सप्टेंबर: अंधश्रद्धा असली की माणूस कोणकोणते चित्र-विचित्र प्रकार करत सुटतो, याचं एक उत्तम उदाहरण परभणीमध्ये पहायला मिळालं. स्मशानभूमीत मांसाहार केल्यानं स्मशानभूमी अपवित्र झाली असं मानून, स्मशानाच तथाकथित शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

19 सप्टेंबर रोजी परभणी अंनिसचे कार्याध्यक्ष पंढरीनाथ शिंदे यांच्या मुलानं स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला. अनिष्ट रुढी-परंपरा आणि भ्रामक कल्पनांना मूठमाती मिळावी, समाजानं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, म्हणून त्यानं आपला वाढदिवस स्मशानात साजरा केला. जेवणात मांसाहारी जेवणही होतं. पण यामुळे स्मशानभूमी अपवित्र झाली, गीता आणि पुराणांमध्येही स्मशानाचं महत्व अधोरिखेत केलंय, म्हणून काही तथाकथित संत आणि महाराजांनी स्मशानाचं शुद्धीकरण केलं.

गोमूत्र शिंपडून आणि मंत्रोच्चारांचं वाचन तिथे करण्यात आलं. विशेष म्हणजे या तथाकथित शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष राजेश वट्टमवारही उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाला या अनिष्ट रुढी मान्य आहेत का, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.

दरम्याम, या सगळ्यात अंनिस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर जिंतूर स्मशानभूमीत वाढदिवस प्रकरणी उद्या जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व हिंदूत्ववादी संघटनांकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. तर अनिस कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणीही मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे अनिसवर कारवाई होणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...

VIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2018 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...