S M L

लातूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबासोबत साजरी

घरातला कर्ता पुरुषच गेल्यानं ही कुटुंब दिवाळी कशी साजरी करतील असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशावेळी तालुक्यातल्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याची संकल्पना मांडली

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 05:16 PM IST

लातूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबासोबत साजरी

लातूर,21 ऑक्टोबर: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात अत्यंत वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी केली जाते आहे. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट देऊन दिवाळी साजरी केलीय.

गेल्या काही वर्षात नापिकी , कर्जबाजारीपणा अशा विविध कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबांवर दुःखाचं सावट अजूनही आहे. घरातला कर्ता पुरुषच गेल्यानं ही कुटुंब दिवाळी कशी साजरी करतील असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशावेळी तालुक्यातल्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला दुजोरा देत सर्वच खात्यातल्या अधिकाऱ्यांनी दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत करण्याचा निर्णय घेतला! सर्व कुटुंबातले कपडे, मिठाई आणि इतर साहित्य देऊन व पणत्या लावून सर्वच अधिकाऱ्यांनी दिवाळी सण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत साजरी केल्यानं त्या कुटुंबाला देखील दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 05:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close