'मिशन शौर्य' फत्ते... आदिवासी विद्यार्थ्यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

जगभरातील गिर्यारोहकांना भूरळ घालणारा माऊंट एव्हरेस्ट, याच एव्हरेस्टरला सर करीत अमरावती जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शौर्याची मोहर उमटवली आहे.

संजय शेंडे संजय शेंडे | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 08:09 PM IST

'मिशन शौर्य' फत्ते... आदिवासी विद्यार्थ्यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

अमरावती, 6 जून- जगभरातील गिर्यारोहकांना भूरळ घालणारा माऊंट एव्हरेस्ट, याच एव्हरेस्टरला सर करीत अमरावती जिल्ह्यातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शौर्याची मोहर उमटवली आहे. 'मिशन शौर्य' मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर फडकावण्यात आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी यशस्वी ठरले. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण आहे. या मोहिमेशी संबंधित प्रत्येकाचे यश असून एव्हरेस्ट सर करणाऱ्या या चार विद्यार्थ्यांचे अमरावती जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

'मिशन शौर्य' या उपक्रमांतर्गत आदिवासी आश्रमशाळांमधील अमरावती अप्पर आदिवासी विभाग अंतर्गत ,धारणी प्रकल्पातील 4 विद्यार्थी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले होते. महाराष्ट्रतून 11 विद्यार्थी होते यशस्वी 9 ठरले असून यापैकी अमरावती आदिवासी विभागाचे शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे,सुषमा मोरे, मुन्ना धिकार हे शिखर सर केले. सुरुवातीला 250 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. यापैकी फक्त 9 विद्यार्थी या मोहिमेत यशस्वी झाले. यापैकी 4 अमरावतीचे आहेत. हे विद्यार्थी आदिवासी आश्रम शाळा बिजुधावडी व टेम्बली या शाळेचे आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अमरावती, जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थ्यांतील धाडसी पणाला साद घालत 'मिशन शौर्य'ची आखणी करण्यात आली. याअंतर्गत मागील महिन्यात मिशन एव्हरेस्टवर पाठवण्यात आले. ऑगस्ट 2018 पासून या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. दार्जिलिंग, लेह-लडाख, वर्धा, हैदराबाद या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात मार्च 2019 हे विद्यार्थी मुंबईहून प्रवास करीत काठमांडूला रवाना झाले होते. तब्बल 8 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर हे विद्यार्थी एव्हरेस्टवर चढल्याची माहिती गुल्लरघाट येथील शासकिय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जवाहरलाल गाढवे यांनी दिली.


भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपाय

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: amaravati
First Published: Jun 6, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...