आधार कार्ड म्हणजे ब्लॅकमेल कार्ड- प्रकाश आंबेडकर

आधार कार्ड म्हणजे ब्लॅकमेल कार्ड- प्रकाश आंबेडकर

आधारच्या माध्यमातून सामान्यांच्या गोपनीयतेला नख लावल्याची टीकाही त्यांनी केलीय.

  • Share this:

03 फेब्रुवारी : आधार कार्ड म्हणजे ब्लॅकमेल कार्ड असल्याचा आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. आधारच्या माध्यमातून सामान्यांच्या गोपनीयतेला नख लावल्याची टीकाही त्यांनी केलीय. शिवसेना म्हणजे नरोवा कुंजरोवा या पलिकडे काहीच सांगता येत नाही असंही ते म्हणाले. वेगळी चूल मांडायची असेल तर पूर्ण वेगळी मांडा. अर्धे त्यांच्या आणि अर्धे यांच्या भांड्यात असले तर अन्न शिजत नसतं, अशी टीका आंबेडकरांनी केलीय.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे जाहीर सभेत भारिप बहुजन महासंघाचे मार्गदर्शक प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. देशातील जनतेचे आधार कार्ड म्हणजे सरकारचे ब्लॅकमेल कार्ड असून आता त्याचाच आधार घेऊन हे राम , हे अल्ला करायला सरकार लावणार असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 06:36 PM IST

ताज्या बातम्या